अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपुजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य उपस्थिती म्हणून हजर होते; त्याचसोबत महसूलमंत्री बावनकुळे, मंत्री नितेश राणे आणि खा. डॉ. अनिल बोंडे हे मान्यवर ही उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी मत्स्य व्यवसायाला चालना मिळावी म्हणून “मत्स्य व्यावसायिकांनाही किसान क्रेडिट कार्डसह शेतकऱ्यांना मिळणारी कर्जे उपलब्ध होतील” अशी घोषणा केली. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात आल्याने शेतकऱ्यांना रोजगाराचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे असेही ते म्हणाले.












