छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात असलेल्या मुद्देशवडगाव येथील दोन चुलत भावांच्या मृत्यूचे गुड उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. लहान चुलत भाऊ सिद्धार्थचा खून केल्यानंतर पोलीस तपासात आपण सापडले जाऊ, या भीतीने आरोपी स्वप्निल चव्हाणने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्निल व सिद्धार्थ या चुलत भावांमध्ये जांभळावरून किरकोळ भांडण झाले होते. या रागातून स्वप्निल ने बिस्किट आणायला जाणाऱ्या आपल्या बारा वर्षे चुलत भावाला संपवले होते. 18 ऑगस्ट रोजी गावातील शिवारातील विहिरीत याचा मृतदेह आढळला होता.












