जयपूरमध्ये एका महिलेने प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पतीचा खून केला असून पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. ३५ वर्षीय मनोज कुमार रायगर यांचा मृतदेह शहरातील फुटबॉल मैदानाजवळ रक्ताच्या थारोळ्यात सापडला असून त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे तपासात स्पष्ट झाले. सुरुवातीला प्रत्यक्षदर्शी किंवा सीसीटीव्ही पुरावे नसल्याने तपास अडचणीत आला होता, मात्र तांत्रिक तपासणी आणि सीसीटीव्ही स्कॅनद्वारे आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांच्या मते, आरोपींनी ‘सीआयडी’ मालिकेतून खूनाचा कट रचण्याची प्रेरणा घेतली होती.












