छत्रपती संभाजी नगर मधील शिवाजीनगर भुयारी मार्ग कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आला असला तरी तो आता वाहनधारकांसाठी घसरगुंडी ठरत आहे. पावसाचे पाणी व चिखल साचल्याने फक्त एका दिवसात तब्बल ३० दुचाकी घसरून अपघातग्रस्त झाल्या आहेत. उद्घाटनापासूनच वादात अडकलेल्या या भुयारी मार्गाबाबत नागरिकांत तीव्र नाराजी आहे.












