CTET 2026 Result: सीबीएसई (CBSE) ने CTET 2026 चा निकाल ३० मार्च रोजी रात्री जाहीर केला आहे. आता उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपले स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकता.
केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET 2026) ची प्रतीक्षा अखेर संपली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आपल्या अधिकृत वेबसाइटवर CTET परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. बऱ्याच काळापासून निकालाची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी ही एक मोठी बातमी आहे. उमेदवार आता घरबसल्या आपला स्कोरकार्ड ऑनलाइन तपासू शकतात.
CTET परीक्षेचा निकाल कसा पाहायचा?
निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांनी सर्वोप्रथम CTET च्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in ला भेट द्यावी.
त्यानंतर “CTET Result 2026” या लिंकवर क्लिक करा.
मग आपला रोल नंबर टाकून सबमिट केल्यानंतर एक स्क्रीन दिसेल
उमेदवार आपला स्कोरकार्ड डाउनलोड करून भविष्यासाठी सुरक्षित ठेवू शकतात.
शिक्षक बनण्याचा मार्ग उमेदवारांसाठी खुला
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळांचे (CBSE) फेब्रुवारी २०२६ साठी केंद्रीय शिक्षण पात्रता चाचणी (CTET) जाहीर केली आहे. हीच परीक्षा ७आणि ८ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील सुमारे १४० शहरांमध्ये घेण्यात आली. ज्यामध्ये सुमारे २५ लाख उमेदवारांनी भाग घेतला होता.
दोन्ही पेपरचा एकत्रित निकाल जाहीर
CBSE ने यावेळी पेपर-1 आणि पेपर-2 दोन्ही जाहीर करण्याची घोषणा केली आहे.
पेपर-1: इयत्ता 1 ते 5 पर्यंत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी.
पेपर-2: इयत्ता 6 ते 8 साठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी.
निकाल पाहण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जावे, होमपेजवरील “CTET February 2026 Result” या लिंकवर क्लिक करावे आणि आवश्यक माहिती टाकून लॉगिन करावे. त्यानंतर गुणपत्रक स्क्रीनवर दिसेल आणि ते डाउनलोड होत राहील.
CTET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान कोणते गुण आवश्यक आहेत?
सर्वसाधारण प्रवर्गासाठी: ६०% गुण आवश्यक. ओबीसी, एससी, एसटी आणि दिव्यांग प्रवर्गासाठी: ५५% गुण आवश्यक.
या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे तिची आजीवन वैधता, म्हणजेच एकदा उत्तीर्ण झाल्यावर प्रमाणपत्र आयुष्यभर वैध राहते. सीबीएसई उमेदवारांना केवळ डिजीलॉकरद्वारे डिजिटल गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे प्रदान करेल.












