नवी मुंबईत जामीन मंजूर झाल्यानंतर मनसेचे योगेश चिले यांनी पहिलीच प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं – “आम्ही पुढेही आमच्या भूमिकेवर ठाम राहणार!” राज ठाकरे एखादा मुद्दा मांडतात तेव्हा तो महाराष्ट्र सैनिक मनापासून उचलतो आणि आम्हीही तेच केलं, असं त्यांनी सांगितलं. चुकीच्या गोष्टींवर कारवाई करण्याचं काम सरकारचं आहे. जर अजूनही डान्सबार सुरू असतील, तर हे सत्ताधाऱ्यांचं स्पष्ट अपयश आहे, असा घणाघातही त्यांनी केला.
(RNO)












