वाशिमच्या कारंजा शहरातील अमर चौक, राम मंदिर रोड परिसरात मोकाट गाईने दहशत माजवत एका महिलेवर आणि तिच्या दोन शाळकरी मुलांवर झडप घालून हल्ला केला. या हल्ल्यात आईसह एका मुलाला गंभीर दुखापत झाली असून, नागरिकांनी धाव घेऊन तातडीने मदत केली व जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.












