Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • दिल्ली विमानतळावर 232 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानातून उड्डाणापूर्वी धूर; मोठा अपघात टळला
ताज्या बातम्या

दिल्ली विमानतळावर 232 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानातून उड्डाणापूर्वी धूर; मोठा अपघात टळला

IndiGo aircraft at the airport with passengers affected by flight cancellations and refund delays

नवी दिल्ली Delhi Airport : दिल्लीहून झुरिचला जाणाऱ्या स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या विमानातील 232 प्रवासी उड्डाणापूर्वी विमानातून धूर येऊ लागल्याने थोडक्यात बचावले. वैमानिकाने तात्काळ उड्डाण रद्द केले आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना बाहेर काढले.

हेही वाचा : वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये डिनर कार्यक्रमात गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले

उड्डाणादरम्यान धूर :

मिळालेल्या माहितीनुसार, झुरिचला जाणारं स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्सचं विमान LX147 रविवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास दिल्लीहून उड्डाण करण्यास सज्ज होतं. उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. मिळालेल्या माहितीनुसार, इंजिनमधील बिघाडामुळं लँडिंग गिअरच्या डाव्या बाजूनं धूर येऊ लागला. धोका लक्षात येताच वैमानिकानं तात्काळ उड्डाण रद्द केलं.

आपत्कालीन स्लाईडद्वारे प्रवाशांना बाहेर काढलं :

एअरलाइनच्या प्रवक्त्यानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना आपत्कालीन स्लाईडद्वारे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. काही प्रवाशांसाठी जिन्याचाही वापर करण्यात आला. किरकोळ दुखापत किंवा अस्वस्थता जाणवल्यामुळं सहा प्रवाशांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं. सध्या, सर्वजण सामान्य स्थितीत असल्याचं सांगण्यात येत आहे. एअरलाइननं सांगितलं की, विमानाची तपासणी करण्यासाठी तांत्रिक तज्ञांचे एक पथक दिल्लीत दाखल होईल. याशिवाय, सर्व प्रवाशांसाठी शक्य तितक्या लवकर पर्यायी प्रवासाची व्यवस्था केली जात आहे.

दिल्ली विमानतळाचं निवेदन :

दिल्ली विमानतळानेही या संदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. निवेदनानुसार, “आज पहाटे, स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या LX 147 (DEL-ZRH) या विमानाच्या रनवे 28/10 वर झालेल्या अपघातामुळं दिल्ली विमानतळावर संपूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली. सर्व स्थापित सुरक्षा नियमावली तात्काळ लागू करण्यात आली आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. विमानतळाच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही.”

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts