दिल्लीतील मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कॅम्प कार्यालयात थेट घुसून एका व्यक्तीने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपीने शिवीगाळ करत थप्पड मारली, केस ओढले आणि दगड फेकण्याचाही प्रयत्न केला. तब्बल ८० सेकंद ही घटना सुरू राहूनही सुरक्षारक्षकांनी वेळीच नियंत्रण मिळवू शकलं नाही. Z+ श्रेणीची सुरक्षा असूनही हा हल्ला झाल्याने दिल्ली पोलिसांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.












