केदारनाथ यात्रेसाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगरातील बजाजनगर येथील 38 वर्षीय भाविकाचा दरड कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत भाविकाचे नाव परमेश्वर भीमराव खवल असे असून, ते एकटेच रेल्वेने यात्रेसाठी गेले होते. गौरीकुंडाहून एक किलोमीटरचा पायी प्रवास करत असताना अचानक दरड कोसळली आणि त्याखाली खवल दबले. बचाव पथकाने तत्काळ शोध घेऊन त्यांना बाहेर काढले व स्थानिक रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.












