सांगलीत नशेसाठी ट्रेमीमाइड औषधी द्रव्याच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. आरोपींकडून २ लाख १५ हजार २३६ रुपयांची ५५८ इंजेक्शन्स व एक दुचाकी जप्त करण्यात आली. ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत रचलेल्या सापळ्यात ही कारवाई झाली. सर्व आरोपींवर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.












