Hair Care Tips | आजकाल केसगळतीची (Hair Fall) समस्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. तणाव (Stress), प्रदुषण (Pollution), केमिकल असलेले शॅम्पू (Chemical Shampoo), हेअर कलरचा (Hair Colour) अतिवापर अशा अनेक गोष्टींमुळे अनेक तरूण-तरूणींमध्ये केसगळतीची समस्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे. तर तुम्ही देखील केसगळतीमुळे त्रस्त असाल तर त्यावर लवकरात लवकर उपाययोजना केली पाहिजे. नाहीतर केस जास्त गळतील आणि टक्कल पडण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला केसगळती थांबवायची असेल आणि केस मजबूत, लांब आणि दाट हवे असतील तर एक घरगुती हेअर पॅक तुम्हाला प्रभावी ठरू शकतो.
हेही वाचा – सकाळी उठल्यावर पोट साफ होत नाहीये? शरीराला लावा ‘ही’ एक सवय, पोट राहील साफ
केस गळतीसाठी प्रभावी घरगुती हेअर पॅक
जर तुमचे केस गळत असतील तर केसांना घरगुती मेथीचा हेअर पॅक लावून बघा. या हेअर पॅकमुळे तुमचे केस गळायचे थांबतील आणि सोबतच तुमचे केस मुलायम, दाट होण्यास मदत होईल.
मेथीचा हा हेअर पॅक बनवण्यासाठी सुरूवातीला दोन चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी भिजवलेले मेथीचे दाणे मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये दोन चमचे दही मिक्स करा. अशाप्रकारे हा मेथीचा हेअर पॅक तयार करा आणि तो केसांच्या टाळूवर व्यवस्थित लावा. हा पॅक अर्धा तास तसाच राहू द्या आणि नंतर केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
आठवड्यातून एकदा हा हेअर पॅक लावा, यामुळे केस गळतीच्या समस्येपासून सुटका होईल. तसेच मेथीच्या हेअर पॅकमध्ये असलेले पोषक घटक तुमच्या केसांची मुळे मजबूत करण्यास मदत करतात. तसेच या पॅकमुळे तुमचे केस दाट आणि मजबूत होण्यात मदत होते. त्यामुळे हा नैसर्गिक हेअर पॅक तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो.
आपल्या केसांची नियमितपणे योग्य काळजी घेणे, संतुलित आहार घेणे आणि नैसर्गिक उपायांचा वापर करणे हे निरोगी केसांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मेथीचा हा हेअर पॅक आठवड्यातून एक-दोन वेळा वापरल्यास केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते आणि केस गळती कमी होऊन केस अधिक दाट व चमकदार दिसू लागतात. मात्र, केस गळतीची समस्या जास्त प्रमाणात जाणवत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणेही तितकेच आवश्यक आहे.











