नांदेड जिल्ह्यात मागील चार दिवसापासून अतिवृष्टी सुरू असून ईसापुर धरणाचे 13 दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पेनगंगा नदीच्या पुलावरून मोबाईल प्रेमी रील काढणे फोटो काढणे स्टंट करणे फारच वाढले असून, त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना सूचना देण्यात येत आहेत. आजच पोलीस उप निरीक्षक, तहसीलदार आमदार यांनी पाहणी केली असता, अनेक तरुण-तरुणी INSTAGRAM वर रील बनवण्याच्या नादामध्ये नदीपात्राच्या कडेला जात आहेत्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.












