सोलापूर जिल्ह्यातील वडाळा येथे बोगस आरोग्य शिबीर भरवून दोन तथाकथित डॉक्टर रुग्णांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले. वैद्यकीय पदवी नसतानाही पावडर स्वरूपातील औषधे देऊन प्रत्येकी ₹५०० ते ₹७०० वसूल केली जात होती. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी छापा टाकून कारवाई केली. आरोपींनी “मी डॉक्टर नाही, फक्त जडीबुटी देतोय” असा बचाव केला पण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.












