वाशिमच्या रीसोड तालुक्यातील बेलखेडा गावात पैनगंगा नदीत शेतकरी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बशीर खा सरफराज खा पठाण हे आपल्या शेतातून नदी ओलांडून गावाकडे परत येत असताना खोल पाण्यात बेपत्ता झाले. घटनेची माहिती मिळताच पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनचे संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथक, पोलीस आणि महसूल विभागाने शोधमोहीम हाती घेतली. जवळपास एक किलोमीटरपर्यंत अंडरवॉटर सर्च ऑपरेशन झाले, मात्र मृतदेहाचा शोध लागला नाही. पाण्याचा वेग, खोली आणि अचूक लोकेशनचा अभाव यामुळे अडथळे निर्माण झाले असून, अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले आहे. सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू होणार आहे.












