OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी भारताला अमेरिकेनंतर त्यांच्या कंपनीचा दुसरा सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखले. त्यांनी म्हटले की भारतातील नागरिक आणि व्यवसाय AI चा अवलंब अत्यंत वेगाने करत आहेत. भारत लवकरच OpenAI चा सर्वात मोठा बाजार बनू शकतो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.












