पालघर जिल्ह्यातील डहाणू गंजाड कोहराली पाडा परिसरात मुंबई–वडोदरा नव्या महामार्गावर भीषण अपघात झाला. संध्याकाळी साडेसहा वाजता भरधाव इकको कार लोखंडी गार्डला धडकली. या दुर्घटनेत चालक बच्चू मासमार यांचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील इतर चार प्रवासी जखमी झाले. विशेष म्हणजे अद्याप पूर्ण न झालेल्या महामार्गावरून वाहने सुरु असल्याने अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत.












