छत्रपती संभाजीनगर मधील बजाजनगर भागात चक्क बापाने 11 वर्षीय मुली जवळ जात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. आई बाहेर गेलेली असताना दारूच्या नशेत असलेल्या बापाने मुलीजवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिला जग आल्याने तिने तेथून पळ काढला. आई परत आल्यानंतर तिने संपूर्ण प्रसंग आईला सांगितला. या प्रकरणी आईने वाळूज पोलिसात जाऊन तक्रार दिली असून त्या नराधम बापावर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

























