वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरातील गजानन होलसेल कपडा शोरूमला मध्यरात्री भीषण आग लागून लाखो रुपयांचे कपडे व साहित्य जळून खाक झाले. मालेगाव नगरपंचायत व रिसोड नगर परिषदेच्या अग्निशमन दलांनी अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली. आग लागण्याचे कारण अद्याप समोर आलेले नसून, घटनेदरम्यान बघ्यांची मोठी गर्दी जमली होती












