गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात डेंग्यूचा कहर सुरू असून आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला आहे. मागील काही दिवसांपासून मुलचेरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळत असून ही संख्या आता शंभरच्या वर गेली आहे. किश्टा बाबुराव टेकुलवार, सुधाकर पोच्या कोगीलवार, नैनतारा सुशील खराती, नंदकिशोर विठ्ठलराव पोलशेट्टीवार आणि सुशीला किश्टा आत्राम अशी एकूण पाच जणांची डेंग्यूमुळे मृत्यूची नोंद झाली आहे.












