गारगोटी-आकुर्डे रोडवरील दौलत देसाई यांच्या शेतात शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गावरील विरोधासाठी झेंडा झळकवून अनोखे आंदोलन केले. “तिरंगा आमच्या शिवारात, शक्तिपीठ नको आमच्या वावरात!” असा शेतकऱ्यांनी संदेश दिला. या आंदोलनात विजयराव देवणे, मधुकर देसाई, राहुल देसाई, जीवन पाटील आणि अनेक स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी शांततामय आणि सर्जनशील मार्गाने सरकारकडे संदेश दिला. याची माहिती सतेज पाटीलांनी सोशल माध्यमांवरून दिली.












