नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागील दोन दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत असून, वीर धरण शंभर टक्के भरले आहे त्यामुळे या वीर धरणातून 54 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग निरा नदी पात्रात सोडला जात आहे. त्यामुळे नीरा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झालीय. नीरा शहरा जवळ असलेला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वारी सोहळ्यासाठी बनवण्यात आलेला जुना ब्रिटिशकालीन पूल देखील पाण्याखाली गेला आहे.












