मागील पाच दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. १४ ते १९ ऑगस्ट या कालावधीत ११ जणांचा जीव गेला आहे. सोबतच ४ लाख ३८ हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून तब्बल ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा नांदेड जिल्ह्याला बसला असून, अजूनही सरी बरसत असल्याने बळीराजा चिंताग्रस्त आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे












