अंबाजोगाई येथे एका माजी पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनील रामराव नागरगोजे असे या पोलीस निरीक्षकाचे नाव असून, त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. गैरवर्तणुकीमुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यामुळे ते नैराश्यात असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.












