छत्रपती संभाजीनगरातील भोईवाड्यात असलेल्या खोदलेल्या खड्यात खेळण्यासाठी गेलेल्या दोन चिमुरड्या मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शेख आहाद आणि शिफान शाकेर खान हे दोन मित्र पाय घसरल्यामुळे पाण्यात बुडले, त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या दुसऱ्या मित्राने स्थानिकांना बोलावले, पण दोघांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन विभागाने दोघांना रुग्णालयात दाखल केले, परंतु ते मरण पावले होते.












