Fuel price hike : अमेरिका, इस्त्रायल विरुद्ध इराण यांच्यातील युद्धजन्य (America, Israel vs Iran War) परिस्थितीमुळे पाकिस्तानातील जनता होरपाळून निघाली आहे. कारण इथे एकाच दिवशी तब्बल ५५ रुपयांनी (An increase of Rs 55 in one day) पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या (Petrol and diesel prices increased) आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढत्या तणावामुळे किमतीत वाढ केल्याचं पाकिस्तान सरकारकडून सांगण्यात येतंय. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल संकटामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पाकिस्तानच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मध्य पुर्वेतील युद्धाचा थेट परिणाम (Direct result of the war) आता सर्व सामान्य जनतेला जाणवू लागले आहेत. शेजारील देश पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर (Pakistan fuel prices) गगनाला भिडले आहेत. त्यामुळे येत्या काळात भारतावर याचे काही परिणाम होतात का? हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा- जे शिंदेंना जमलं, ते ठाकरेंना का नाही? वाघमारेंना न्याय, मग अंधारेंवर अन्याय का?
पाकिस्तानमध्ये फक्त 26 दिवस पुरेल इतकाच इंधन साठा
पाकिस्तानमध्ये फक्त 26 दिवस पुरेल इतकाच इंधन साठा असल्याची माहिती पुढे आली होती. आज मध्यरात्री 12 वाजेपासून हे नवे दर लागू होतील. त्यामुळे आता डिझेल 335.86 रुपये प्रती लिटर तर पेट्रोल 321.17 रुपये प्रती लिटर दराने जनतेला विकत घ्यावं लागणार आहे.पाकिस्तान सरकारने पत्रकार परिषदत घेत पेट्रोल दरवाढीची घोषणा केली. इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमधील सुरु असलेल्या संघर्षामुळे पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती गगनाला भिडल्या असल्याचं पाकिस्तानच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं.
पाकिस्तानलाच नाही, तर अनेक देशांना फटका बसण्याची शक्यता
दरम्यान, मध्यपूर्वेतील वाढत चाललेल्या संघर्षामुळे फटका केवळ पाकिस्तानलाच नाही, तर अनेक देशांना बसण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आगामी काळात हा तणाव आणखी वाढला, तर इंधनाच्या किमतीत आणखीन वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर याचा मोठा भार पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जागतिक बाजारपेठेत तेल आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती
मध्यपूर्वेतील इराण युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत तेल आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती आधीपासूनच व्यक्त केली जात होती. पाकिस्तानने या संकटाचा सामना करण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी इंधनाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या दरवाढीमुळे पाकिस्तानातील वाहतूक खर्च वाढणार असून, त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होणार आहे.
पाकिस्तानी जनतेसाठी ही दरवाढ ‘दुष्काळात तेरावा महिना’
आधीच महागाईने कंबरडं मोडलेल्या पाकिस्तानी जनतेसाठी ही दरवाढ ‘दुष्काळात तेरावा महिना’ ठरली आहे.. सत्तेवर आलेल्या नव्या सरकारसमोर आता या जनक्षोभाला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पेट्रोल पंपांवर लोकांची मोठी गर्दी झाली असून, पाकिस्तान सरकारला या आर्थिक संकटात मोठा धक्का बसला आहे.





