Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • इराणच्या युद्धामुळे पाकिस्तान संकटात; इंधनचा मोठा तुटवडा, पेट्रोल पंपावर झुंबड
ताज्या बातम्या

इराणच्या युद्धामुळे पाकिस्तान संकटात; इंधनचा मोठा तुटवडा, पेट्रोल पंपावर झुंबड

Impact of Iran War on Pakistan | गेल्या काही दिवसांपासून अमेरिका (America), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये युद्धाचा वणवा भडकला आहे. इस्त्रायल, अमेरिकेने इराणवर हल्ले करत या युद्धाला सुरूवात केली होती. त्यानंतर आक्रमक इराणनेही प्रतिहार करत युद्ध आणखी पेटवलं होतं. त्यानंतर जे युद्ध सुरू झाले आहे ते संपायचं नावच घेत नाहीये. अमेरिका, इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त इराणने प्रतिहार करत अमिरेकेच्या तळांना लक्ष्य करत सात देशांवर हल्ला केला. यामध्ये त्यांनी हार्मुझ मार्गही बंद केला आहे. इराणच्या या हल्ल्यामुळे पाकिस्तान (Pakistan) संकटात सापडला आहे. या हल्ल्याचा परिणाम पाकिस्तानच्या इंधन पुरवठ्यावर (Fuel Supply) झाला आहे.

हेही वाचा  – महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, कोण आहेत नवे राज्यपाल? जाणून घ्या सविस्तर

पाकिस्तानमधील डिझेल, पेट्रोलचा साठा झपाट्याने कमी

इराणने केलेल्या हल्ल्यामुळे समुद्री मार्गे होणारी आयात-निर्यात ठप्प झाली आहे. याचा परिणाम पाकिस्तानसह अनेक देशांवर झाला आहे. अनेक देश संकटात सापडले आहेत. यामध्ये पाकिस्तानमधील डिझेल, पेट्रोलचा साठा झपाट्याने कमी झाला आहे. काही दिवसच इंधन साठा शिल्लक राहण्याची भीती पाकिस्तानला आहे.

पाकिस्तानमध्ये काही दिवस चालेल एवढाच इंधनसाठा शिल्लक राहिला आहे. तसेच पाकिस्तान सरकार 20-25 दिवसांचा इंधन पुरवठा असल्याचा दावा करत आहे, तरीही मागील तीन दिवसांपासून आम्हाला काहीही मिळालेले नाही, असा दावा पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये इंधनाची कमतरता सुरू असून त्याचा वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे.

इंधनवर झालेल्या परिणामाबाबत असोसिएशनचे केंद्रीय सरचिटणीस चौधरी इरफान इलाही यांनी म्हटलं आहे की, डिझेलचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. आता फक्त 20% एवढाच डिझेलचा साठा राहिला आहे. तर पेट्रोलचा पुरवठाही खूप जास्त प्रमाणात कमी झाला आहे. इंधनच्या पुरवठ्यातील या कमतरतेमुळे परिस्थिती फार गंभीर बनत चालली आहे.

पाकिस्तानने पेट्रोल-डीझेलचे दर वाढवले

इंधनाच्या पुरवठ्यातील कमतरतेमुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डीझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पेट्रोलच्या किमती 35 पाकिस्तानी रुपयांनी वाढल्या आहेत तर डीझेलच्या किमती 17 रूपयांनी वाढल्या आहेत. जरी किमती वाढल्या असल्या तरी दररोजच्या वाहतूकीमुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून एकच गोंधळ उडाला आहे.

गुरूवारी पीपीडीए नेत्यांनी म्हटलं की, जर इंधन पुरवठा सुधारला नाही तर काही दिवसांमध्ये पेट्रोल पंप बंद होऊ शकतात. तसेच सर्व ओएमसी त्यांना त्रास देत असल्याचा दावाही त्यांनी केला. सोबतच या आठवड्याच्या शेवटी पाकिस्तानचा तेल पुरवठा जवळजवळ संपेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, इराणने अमेरिका आणि इस्त्रायल तळांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोन, मिसाईलचा वापर करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तर इराणने आत्तापर्यंत 9 देशांमधील 13 अमेरिकन तळांना लक्ष्य करत त्यांच्यावर हल्ला केला आहे. तर या युद्धात इराणसोबत अमेरिकेलाही मोठा फटका बसला आहे. या युद्धात अमेरिकेच्या 6 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts