माओवादविरोधी मोहिमेत जीवाची जोखीम पत्करून कार्य करणाऱ्या गडचिरोली पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह 279 जवानांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. राज्यातील एकूण 617 पदकांपैकी सर्वाधिक पदके गडचिरोली पोलिसांच्या नावावर गेली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी 12 ऑगस्ट रोजी या पदकांची घोषणा केली.












