छत्रपती संभाजीनगरात झोपेत असताना अंथरुणात विषारी साप चावल्याने १३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास कर्णपुरा भागात हा प्रकार घडला. मृत मुलीचे नाव वैष्णवी अखिलेश पवार असे असून तिचे वडील बांधकाम कामगार आहेत. रात्री वैष्णवी घरात झोपलेली असताना सापाने तिला चावा घेतला. हा प्रकार लक्षात येताच तिच्या वडिलांनी तिला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.












