पिकाणेश्वर महादेव दर्शन घेऊन माघारी परतताना ब्रेक फेल झाल्याने ट्रॅक्टर थेट दरीत कोसळले. या घटनेत कांताबाई नारायण गायके, कमलाबाई शामराव जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. तर भक्ती राऊत ही गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना चौथ्या दिवशी तिची प्राणजित मालावली. चिमुकल्या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

























