धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय केंद्रावरून धान खरेदी केली जाते. मात्र यावर्षी जिल्हा कार्यालयाला कमी उद्दिष्ट मिळाल्याने गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकरी धान विक्रीपासून वंचित झाले आहेत. सुरुवातीला शासनाने 11 लक्ष क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. ते उद्दिष्ट संपल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांकरिता शासनाच्या वतीने 7 लक्ष 38 हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले होते. मात्र आठवडाभरातच उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याने आणखी 10 हजार शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहणार आहेत.












