मराठा समाजाच्या वतीने खंडोबाला साकडे
पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे मराठा समाजाच्या वतीने मुंबईमध्ये आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना उत्तम आरोग्य लाभावे. यासाठी जेजुरीच्या खंडोबाला अभिषेक घालण्यात येणार आहे. सकाळी ११:३० वाजता जेजुरी येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये एकत्र येत मराठा बांधवांनी जेजुरीच्या मंदिराकडे प्रस्थान केले आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव एकत्र जेजुरी गडावर निघाले आहेत. जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा आणि त्यांचे आरोग्य चांगलं राहावं, यासाठी खंडोबा देवाला अभिषेक करून साकडे घालण्यात येणार आहे.