धाराशिवच्या येडेश्वरी मंदिरात गावगुंडांनी आज नारळी पौर्णिमेनिमित्त राडा घालत सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. दर्शनासाठी जात असताना हटकल्याने संतप्त झालेल्या 4-5 जणांनी रक्षकाला जबर मारहाण केली, तर नंतर 20-25 जणांनी एकत्र येत भाविकांमध्ये दहशत माजवली. काही भाविकांना धक्काबुक्की केल्याची माहिती मिळाली असून, मारहाणग्रस्त तरुणाने पोलिसात फिर्याद दिली आहे.












