बीडच्या वडवणी येथील न्यायालयात सरकारी वकिलाने खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍडव्होकेट विनायक चंदेल असे या मृत वकिलाचे नाव आहे. कोर्टातील वकिलांच्या चेंबरमधील खिडकीच्या गजाला गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले. दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.












