हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. त्यानंतर नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याची आदेश यंत्रणेला दिले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी वसमत तालुक्यातील हट्टा येथे थेट शेतीच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन बाधित पिकांची पाहणी केली.












