काल सकाळपासून बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला, यामध्ये चिखली तालुक्यात अक्षरशा पावसाचा कहर झाला. जांबुवंती नदीला मोठा पूर आल्याने संपूर्ण चिखली शहराला पावसाचा विळखा पडला होता, शहरातील माळीपुरा आणि दरगाह परिसरात तीन ते चार फूट पाणी तुंबल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले, घरातील जीवनावश्यक वस्तूंसह धान्याचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील नागरिकांना बचाव पथकामार्फत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर पुढील तीन दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट असल्याने चिखली शहरासह तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आजही प्रशासन अलर्ट मोडवर असल्याच पाहायला मिळतंय.












