रत्नागिरीत संततधार सुरू असून अंजनारी येथील दत्त मंदिरात पाणी शिरले आहे. काजळी नदीच्या पुराच्या पाण्याने मंदिर परिसरात प्रवेश केला आहे. नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, पुढील काही तास अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.












