जळगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोरनार शिवारात अनेक शेतांमध्ये मका व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे मका अक्षरशः जमीनदोस्त झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आणि तात्काळ पंचनामे करावेत व हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.












