Hemant Khandelwal Daughter Surabhi Khandelwal Death | नुकतीच एकच धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्यप्रदेशचे (Madhya Pradesh) भाजप प्रदेशाध्यक्ष आणि बैतुलचे आमदार हेमंत खंडेलवाल (Hemant Khandelwal) यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हेमंत खंडेलवाल यांची मुलगी सुरभी खंडेलवालचं निधन (Surbhi Khandelwal Death) झाले आहे. यामुळे खंडेलवाल कुटुंबासह भाजप (BJP) पक्षात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी मोठी सूचना! ‘ही’ नोंदणी केली नाही तर कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही
सुरभी खंडेलवाल यांच्या निधनानं कुटुंबियांवर दु:खाचे सावट
हेमंत खंडेलवाल यांनी मुलगी सुरभी खंडेलवाल या 34 वर्षांच्या होत्या. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरभी खंडेलवाल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला आहे. या धक्कादायक बातमीनंतर खंडेलवाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
फिजिओथेरपी करायला गेल्या अन् प्रकृती बिघडली
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुरभी खंडेलवाल या सकाळी 11.30 च्या दरम्यान फिजिओथेरपी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर अचानक त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि त्यांची प्रकृती बिघडली. यानंतर काही वेळातच सुरभी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुलीचे निधन झाले तेव्हा हेमंत खंडेलवाल हे भोपाळमध्ये होते. मात्र, लेकीच्या निधनाची बातमी समजताच ते तातडीने घरी पोहोचले.
सुरभी खंडेलवाल यांचे अंत्यविधी बैतुलमध्ये पार पडले. तसेच त्यांच्या निधनानंतर हेमंत खंडेलवाल यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने नातेवाईक आणि भाजप पक्षाचे कार्यकर्ते, नेते जमा झाले होते. तर या दु:खद बातमीनंतर मुख्यमंत्री मोहन यादव, ज्योतिरादित्य शिंदे, शिवराजसिंह चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत म्हटलं की, या दुःखद प्रसंगी आम्ही संपूर्ण जनतेला खंडेलवाल कुटुंबाप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्याचे आवाहन करतो. देवाने सुरभी यांच्या आत्म्याला शांती द्यावी आणि कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी अशी आम्ही प्रार्थना करतो. सुरभी खंडेलवाल यांचे निधन हे केवळ वैयक्तिक नुकसान नाही तर समाज आणि राजकारणासाठी एक संवेदनशील क्षण आहे. त्यांचे जीवन, त्यांचे संघर्ष आणि त्यांच्या कुटुंबाप्रती असलेले त्यांचे समर्पण नेहमीच लक्षात राहील.
दरम्यान, सुरभी खंडेलवाल यांना लहानपणापासूनच आरोग्याच्या समस्या होत्या. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांची काळजी घेत होतं आणि त्यांच्यावर नियमित उपचार देखील सुरू होते. अशातच आता सुरभी यांच्या निधन झाल्याने खंडेलवाल कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले आहे.












