महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यांतील सर्व शाळा व वरिष्ठ महाविद्यालयांना आज 19 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, पावसामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत होणारी गैरसोय टाळण्यासाठी अंतिम मुदत 20 ऑगस्टवरून वाढवून 22 ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे.












