Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • डार्क अंडरआर्म्समुळे लाज वाटते? टेन्शन घेऊ नका, ‘हे’ नैसर्गिक उपाय ठरतील प्रभावी
ताज्या बातम्या

डार्क अंडरआर्म्समुळे लाज वाटते? टेन्शन घेऊ नका, ‘हे’ नैसर्गिक उपाय ठरतील प्रभावी

Dark Underarms Solution | आजकाल काखेचा काळेपणा (Dark Underarms) ही एक खूप सामान्य समस्या बनली आहे. काखेतील काळेपणामुळे बऱ्याच मुली Sleeveless कपडे घालायचं टाळतात. तर काही मुलींना बाहेर पडताना अनेकदा लाज वाटते. तर या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी महिला विविध उत्पादने वापरतात, पण त्यांना समाधानकारक परिणाम दिसत नाहीत. पण कदाचित तुम्हाला हे माहित नसेल की, तुम्ही काही सोप्या घरगुती उपायांनी काखेचा काळेपणा दूर करू शकता. तर आता आपण काही सोप्या घरगुती उपायांबाबत जाणून घेणार आहोत जे तुमच्या काखेतील काळपटपणा घालवण्यास मदत करतील.

हेही वाचा – पांढऱ्या केसांना म्हणा बाय-बाय! हे तेल वापरायला सुरुवात करा, नैसर्गिकरित्या केस होतील काळे

काखेचा काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय कोणते?

1. दही आणि बेसनचा पॅक – दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते जे आपली त्वचा उजळ करण्यास मदत करेत. तर बेसन त्वचेतील अशुद्धी दूर करते. त्यामुळे दही आणि बेसनचा पॅक आपल्या त्वचेचा काळपटपणा घालवण्यास फायदेशीर ठरतो. तर हा पॅक बनवण्यासाठी 1 चमचा बेसन, 1 चमचा दही आणि चिमूटभर हळद घ्या आणि हे सर्व एकत्र मिक्स करा. नंतर तयार झालेला हा पॅक तुमच्या काखेवर लावा लावा आणि तो सुकू द्या. हा पॅक पूर्णपणे सुकल्यानंतर तो कोमट पाण्याने पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा पॅक आठवड्यातून एकदा लावा, यामुळे तुमच्या काखेचा काळपटपणा दूर होण्यास मदत होईल.

2. लिंबू आणि बेकिंग सोडा – लिंबू एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे आणि बेकिंग सोडा त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतो. त्यामुळे लिंबू आणि बेकिंग सोडा तुमच्या काखेतील काळपटपणा घालवण्यास प्रभावी ठरतो. याचा वापर करण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा थोड्या लिंबाच्या रसात मिसळून पेस्ट बनवा. ती पेस्ट तुमच्या काखेत लावा आणि 5 मिनिटे तशीच राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवून टाका. यामुळे तुम्हाला नक्कीच प्रभावी रिझल्ट मिळेल.

3. बटाट्याचा रस – बटाट्यामध्ये काही असे गुणधर्म असतात जे त्वचेला उजळ करतात. यासाठी बटाट्याची एक फोड कापून काखेत चोळा किंवा बटाट्याचा रस काढून कापसाच्या बोळ्याने लावा. तो रस 10 ते 15 मिनिटे तसाच ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या काखेतील काळपटपणा गायब होईल आणि तुमची त्वचा उजळेल.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts