कौटुंबिक भांडणातून पती पत्नी मध्ये वाद झाल्याच्या कारणाने रागाच्या भारत पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करत तिला जखमी केल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेनंतर पतीने स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. आनंदा महारु धनगर असे आत्महत्या करणाऱ्या 42 वर्षीय पतीचे नाव असून त्यांची पत्नी रेखा धनगर ह्या गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी मुलाच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.












