IIM नागपूरचा सॅटेलाईट कॅम्पस आता पुण्यात उभारला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे ७० एकर जागा दिली आहे. सुरुवातीला ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट आणि डेटा सायन्ससारखे विशेष कोर्स सुरू होतील, तर पुढील काही वर्षांत पूर्णवेळ MBA सुरू करण्याची योजना आहे. विकासाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.












