वाशिमच्या मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथे नाबार्ड-२९ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्ता व लहान पुलाच्या बांधकामावर गेल्या आठ महिन्यांपासून मेन लाईनवरून थेट वायर टाकून वीज चोरी केल्याचा आरोप समोर आला आहे. कंत्राटदार धीरज अनिल मालपाणी यांच्या मार्फत सुरू असलेल्या या कामाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. शासनाने वीज चोरीबाबत कठोर भूमिका घेतली असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्याने स्थानिक संतप्त असून, तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.












