अमरावती जिल्ह्याच्या ग्राम शिरजगाव कोरडे येथील अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी या मागणीसाठी ग्रामपंचायत उपसरपंचासह पदाधिकारी व नागरिक अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. गावातील तरुण अवैध दारू विक्रीमुळे व्यसनाधीन होत असून, गावात दारू विक्री बंदीचा ठराव घेतल्यानंतरही राजरोसपणे दारू विक्री होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या दारूमुळेच तरुणांचे मृत्यू देखील झाले आहे. बस स्थानक व इतर मुख्य ठिकाणी गावांमध्ये दारू पिऊन व्यसनाधीन तरुणांचा वावर वाढला आहे. अशा सार्वजनिक ठिकाणावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे गावातील अवैध दारू विक्रीवर तत्काळ दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.












