India-Australia First T20 Match Rain: इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळं रद्द करण्यात आला आहे. मंगळवारी (29 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पावसामुळं सामन्यात दोनदा व्यत्यय आला, ज्यामुळं षटकांची संख्या 18 पर्यंत कमी करण्यात आली. मात्र यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली यानंतर सामना रद्द करण्यात आला.
भारताची प्रथम फलंदाजी
सामना रद्द झाला तेव्हा भारत फलंदाजी करत होता. सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल क्रीजवर होते. भारताचा स्कोअर 97/1 (9.4/18 षटक) होता. अभिषेक शर्माच्या रुपात भारताचा एकमेव धक्का बसला. सततच्या पावसामुळं कॅनबेरामध्ये सुरु असलेला खेळ शक्य झाला नाही. मालिकेतील पुढील सामना आता 31 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये खेळला जाईल. भारताचा नंबर वन टी-20 फलंदाज अभिषेक शर्मानं त्याचा उपकर्णधार शुभमन गिलसह डावाची सुरुवात केली. दोघांनीही दमदार सुरुवात केली. भारतीय संघानं पहिल्या तीन षटकात 26 धावा जोडल्या. पहिलाच षटक टाकणाऱ्या नाथन एलिसनं पाचव्या चेंडूवर अभिषेक (19) ला टिम डेव्हिडकडे झेलबाद केलं.
The first #AUSvIND T20I has been abandoned due to rain. 🌧️
Scorecard ▶️ https://t.co/VE4FvHBCbW#TeamIndia pic.twitter.com/biJYDFe9Ah
— BCCI (@BCCI) October 29, 2025
सूर्याचा विक्रम
सूर्यकुमार यादवपूर्वी, फक्त मोहम्मद वसीम (यूएई) ने कमी डावांमध्ये 150 वा षटकार मारला. सूर्यानं 86 डाव आणि 1649 चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला, तर वसीमनं 66 डाव आणि 1543 चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हेड टू हेच रेकॉर्ड India-Australia First T20 Match Rain
हेड-टू-हेडच्या बाबतीत, टीम इंडिया ऑस्ट्रेलियापेक्षा आघाडीवर आहे. आतापर्यंत खेळलेल्या 32 सामन्यांपैकी भारतानं 20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं आहे. दुसरीकडे, कांगारु संघानं फक्त 11 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. ऑस्ट्रेलियानं 2012 पासून त्यांच्याच देशात भारताला टी-20 मालिकेत हरवलेलं नाही. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यानंतर, टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादववर आता एक महत्त्वाची जबाबदारी आहे. गेल्या पाच टी-20 मालिकांमध्ये, भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त एकदाच ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पराभव पत्करावा लागला आहे, तो 2008 मध्ये.











