Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • तणावाच्या काळात भारताची कूटनीती चमकली; होर्मुजमधून जहाजे सुरक्षित परतली
Top News

तणावाच्या काळात भारताची कूटनीती चमकली; होर्मुजमधून जहाजे सुरक्षित परतली

India diplomacy Hormuz Strait

India diplomacy Hormuz Strait: इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीत सुरक्षितपणे पोहोचली आहेत, ज्यामुळे भारताच्या लष्करी आणि सागरी धोरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे.

इराण- इस्रायल संघर्षादरम्यान होर्मूझच्या सामुद्रधुनीतून भारतात सुरक्षितपणे पोहोचलेल्या जहाजांसाठी नवी दिल्लीच्या मुत्सद्देगिरी आणि लष्कराचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. काही परदेशी माध्यमांनी असा दावा केला होता की, जहाजांच्या सुरक्षेसाठी भारताने इराणला पैसे दिले होते. भारत सरकारने स्पष्ट केले आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी ही एक आंतरराष्ट्रीय सामुद्रधुनी आहे आणि ती ओलांडण्यासाठी कोणत्याही देशाच्या परवानगीची आवश्यकता नाही.

हेही वाचा: Morning Breakfast: खमंग आणि हेल्दी नाश्ता हवाय? 10 मिनिटांत तयार करा गव्हाच्या पिठाचे धिरडे!

भारताने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर युद्धनौका तैनात केल्यानंतर आणि नौवहन मंत्रालयाच्या कायद्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर, ‘रिपब्लिकन्स ओव्हरसीज इस्रायल’चे अध्यक्ष मार्क झेल यांनी भारताच्या भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले की, भारत आपल्या ऊर्जा संसाधनांच्या सुरक्षेसाठी नौदल शक्तीचा वापर करतो आणि हे पाश्चात्य देशांसाठी एक उदारहण असू शकते.

ऊर्जा सुरक्षेसाठी भारत नौदलाचा वापर

मार्क झेल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भारताचे विशेष अभिनंदन केले आणि म्हटले की, भारत इराणला कोणताही पाठिंबा देत नाही, उलट आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी नौदलाचा वापर करतो. हा पाश्चात्य देशांसाठी एक धडा आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये भारतीय युद्धनौका तैनात

इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याच्या हालचालीनंतर, भारताने या प्रदेशात युद्धनौकांची संख्या वाढवली आहे. या नौका भारतात येणाऱ्या व्यापारी जहाजांना सुरक्षा आणि सुरक्षित मार्गदर्शन पुरवतात.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले की, अल-काधा काळात होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणारी अनेक भारतीय जहाजे भारतात सुरक्षितपणे पोहोचली आहेत. सरकार विविध देशांतील पुरवठादारांच्या संपर्कात आहे आणि शक्यतोवर सर्व प्रकारच्या तेल आणि वायूचा पुरवठा कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लोकसभेत बोलताना पंतप्रधान म्हणाले, “सरकार विविध देशांतील पुरवठादारांच्या संपर्कात आहे. तेल, वायू आणि खनिजे यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा अखंडित राहावा, हा आमचा प्रयत्न आहे. आम्ही सातत्याने आखाती प्रदेश आणि आसपासच्या सागरी मार्गांवर लक्ष केंद्रित करत आहोत. आमचे सागरी मार्ग सुरक्षित राहावेत, यासाठी आमचा जागतिक भागीदारी संवाद सुरू आहे.”

 

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts