Women’s ODI World Cup : महिला वनडे विश्वचषक 2025 चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघात डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला. टीम इंडियानं हा सामना 52 धावांनी जिंकला. यासह टीम इंडियानं 52 वर्षांत पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषक विजेतेपद पटकावलं. या सामन्यात टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी 50 षटकांत 7 गडी गमावून 298 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आफ्रिकन संघ या सामन्यात 246 धावांवर ऑलआउट झाला. या सामन्यात भारताकडून शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतकं झळकावली.
𝐂.𝐇.𝐀.𝐌.𝐏.𝐈.𝐎.𝐍.𝐒 🏆
Congratulations to #TeamIndia on winning their maiden ICC Women’s Cricket World Cup 🇮🇳
Take. A. Bow 🙌#WomenInBlue | #CWC25 | #Final | #INDvSA pic.twitter.com/rYIFjasxmc
— BCCI Women (@BCCIWomen) November 2, 2025
भारताकडून शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांची अर्धशतकी खेळी
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी प्रथम फलंदाजी करताना भारताला चांगली सुरुवात करून दिली. या दोघींनी 104 धावांची सलामी भागीदारी केली. स्मृतीनं 58 चेंडूत 45 धावा केल्या. या सामन्यात शेफाली वर्माला शतक झळकावण्याची संधी होती, पण ती हुकली. तिनं 78 चेंडूत 87 धावा केल्या, त्यात सात चौकार आणि दोन षटकार समावेश आहे. उपांत्य सामन्यात शतक झळकावणारी जेमिमा 37 चेंडूत केवळ 24 धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर 29 चेंडूत 20 धावा केल्यानंतर क्लीन बोल्ड झाली. अमनजोतनं 14 चेंडूत 12 धावा केल्या. तर शेवटी रिचा घोषनं 34 धावा केल्या. दीप्ती शर्मा 58 धावांवर धावबाद झाली. दक्षिण आफ्रिकेकडून ऐबोंगा खाकानं सर्वाधिक तीन बळी घेतले.
हे ही वाचा – India vs Australia T20 series : तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा शानदार विजय; मालिकेत बरोबरी
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टची शतकी खेळी व्यर्थ
टीम इंडियानं दिलेल्या विक्रमी 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली. तजामिन ब्रिट्स आणि लॉरा वोल्वार्ड्ट यांनी पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. ब्रिट्स 35 चेंडूत 23 धावांवर बाद झाली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या अँनेके बॉशला तिचं खातं उघडता आलं नाही. त्यानंतर सून लुसनं 35 आणि सिनालो जाफानं 16 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या इतर फलंदाजांना फारसं यश मिळवता आलं नाही, मात्र कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टनं शानदार शतक झळकावलं. ती 98 चेंडूत 101 धावांवर बाद झाली, त्यात 11 चौकार आणि एक षटकार मारला. अमनजोत कौरनं एक शानदार झेल घेतला आणि ती बाद होताच भारताचा विजय निश्चित झाला. गोलंदाजीत भारताकडून दीप्ती शर्मानं सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.









