अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने मान्य केले आहे की भारत कोणत्याही दबावाखाली झुकून निर्णय घेणारा देश नाही. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी भारताच्या ठाम भूमिकेमुळे अमेरिकन प्रशासन त्रस्त असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की भारत अमेरिकेशी व्यापार चर्चेत ‘थोडा हट्टी’ पणा दाखवत आहे आणि आपल्या भूमिकेवर ठाम आहे, त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार कराराला अंतिम स्वरूप देणे सध्या कठीण झाले आहे.












