Indian Oil recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पदवीधर आणि बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडियन ऑईलच्या पाईपलाइन विभागात २०२६ या वर्षासाठी अप्रेंटिस उमेदवारांच्या एकूण ३९४ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी आज २८ जानेवारीपासून सुरू झाली असून अंतिम मुदत १० फेब्रुवारी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार इंडियन ऑईलचे अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. यावेळी उमेदवारांची निवड केवळ त्यांच्या शैक्षणिक गुणांच्या गुणवत्तेवर केली जाणार आहे.
हेही वाचा – उपमुख्यमंत्री पदाचा विक्रम करणाऱ्या अजितदादांची संपूर्ण राजकीय कारकीर्द
इंडियन ऑईलच्या पाईपलाइन विभागात असलेली ही भरती देशातील विविध विभागांतर्गत केली जात आहे. ही भरती इंडियन ऑइलच्या पाइपलाइन्स विभागांतर्गत पश्चिम, पूर्व, उत्तर आणि दक्षिण अशा चारही विभागांत केली जात आहे. यामध्ये पश्चिम विभागात सर्वाधिक रिक्त पदे असून, त्याखालोखाल पूर्व, उत्तर आणि दक्षिण भागात विभागणी करण्यात आली आहे. अशा प्रकारे संपूर्ण देशातील विविध राज्यांमध्ये एकूण ३९४ अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. यात महाराष्ट्र राज्याचा समावेश पश्चिम विभाग पाईपलाईन्समध्ये करण्यात आला आहे.
या भरती मोहिमेअंतर्गत विविध पदे भरतील जाणार असून त्यासाठी शैक्षणिक पात्रता पदांवर अलंबून असणार आहे. टेक्निशियन अप्रेंटिससाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, टेलिकॉम आणि इन्स्ट्रमेंटेशन पदांसाठाी संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील ३ वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे. असिस्टंट एचआर या पदासाठी कोणत्याही विषयातील पूर्णवेळ पदवी. अकाउंटंट पदांसाठी वाणिज्य शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. डेटा एन्ट्री ऑपरेट किमान १२ वी उत्तीर्ण, परंतु पदवीधर नसावा, अशी अट घालण्यात आली.
या अर्जदाराचे वय ३१ जानेवारी २०२६ रोजी किमान १८ वर्षे आणि कमाल २४ वर्षे असणे आवश्यक आहे. भरती नियमांनुसार, एसी/एसटी उमेदवारांना ५ वर्षे, तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची वयात सवलत दिली जाईल. सर्व उमेदवारांनी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत आपली शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे अनिवार्य आहे.






